mysanjeevan

Thursday 27 March 2014


स्थूलता आणि प्रजननक्षमता

 लठ्ठपणामुळे केवळ आपण कसे दिसतो किंवा आपल्या शरीरयष्टी यावरच परिणाम होत नाही तर त्याचबरोबर शरीरातील हार्मोन्सचे संतुलन आणि विकारांवरही परिणाम होतो. अलीकडेच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार बॉडी-मास इंडेक्स (बीएमआय)चे अतिरिक्त प्रमाण असलेल्या स्त्री-पुरूषांमधील प्रजननक्षमता नष्ट होण्याचे प्रमाण सरासरी वजनाच्या लोकांपेक्षा जास्त असते. प्रजननक्षमता नष्ट झालेल्या ७० टक्के स्त्रिया या लठ्ठपणालाही बळी पडलेल्या असतात असे अहवाल सांगतो. या माहितीनुसार पुरूषांचे वजन नऊ किलोग्रॅमने वाढल्यास त्यांची प्रजननक्षमता किमान १० टक्के घटते. लठ्ठ माणसांमधील शुक्राणूंचे प्रमाण कमी असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यताही उणावते.

स्त्री आणि पुरूषांमध्ये लठ्ठपणा अनेक प्रश्न जन्माला घालतो. त्यात शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रश्नांचा समावेश आहे. शरीरातील चरबीचा (फॅट) अनेक अत्यावश्यक हार्मोन्सच्या निर्मितीशी थेट संबंध असतो. या आगंतुक हार्मोन्समुळे पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि शुक्राणू घटतात, तर स्त्रियांमध्ये पाँलिसायस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओज) हा आजार उपटतो.

प्रजननक्षमता घसरण्याची विविध कारणे आहेत. त्यात आनुवांशिकता, आहार आणि पर्यावरण या गोष्टी असल्या तरी शरीराचे वजन हा महत्वाचा घटक जवळपास सर्व हार्मोन्सच्या अनियंत्रित वाढीत काम करतो. लठ्ठपणाने गर्भधारणेचे प्रमाण कमी होतेच पण कामेच्छाही लोपू लागते. शरीरातील चरबीमुळे शरीरसंबंधावर थेटच परिणाम होतो. लठ्ठ स्त्रियांमध्ये गर्भधारणा होत नसल्यास जादा वजन कमी केल्यानंतर चटकन फरक पडतो.

प्रजननक्षमता नष्ट होण्याची लक्षणे

गरज नसताना केसांची वाढ

मानेच्या वळ्यांमध्ये काळे डाग वाढणे (अकॅन्थोसिस)

याशिवाय गर्भवती असताना इन्शुलिनला प्रतिकार करण्याचे (इन्शुल‌िन रेझिस्टंस) तात्पुरता मधुमेह होण्याचे प्रमाणही खूप वाढते. विशेषतः, हे प्रमाण लठ्ठपणा आणि मधुमेहाची आनुवांशिकता असेल तर जास्त होते.

लठ्ठपणा आणि गर्भधारणेवर परिणाम

शरीराचे वजन आणि चरबी या गोष्टींचा स्त्रियांमधील गर्भधारणेवर थेट परिणाम होतो. लठ्ठ स्त्रियांमधील गर्भाशयाची यंत्रणा बिघडू शकते आणि बीजधारणेवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यात मासिक पाळीचे प्रश्न दिसतात. पॉलिसायस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस)सारख्या आजारांत शरीरातील हार्मोन्स अनियमित होतात. त्यामुळे गर्भाशयावर छोटी पुटे येतात. त्यामुळे गर्भ राहण्यात अडचणी येतात.

पुरूषांची वजनवाढ आणि प्रजनन

पुरूषांमधील लठ्ठपणामुळे टेस्टिक्युलर यंत्रणा खराब होते. चरबीच्या अनियमित वितरणाने पुरूषांमधील हार्मोन्सचे रूपांतर स्त्रियांच्या हॉर्मोन्समध्ये होते. त्यामुळे छातीच्या भागात चरबी तर वाढतेच पण शुक्राणूंच्या निर्मितीत घट होते.

 सौजन्य -
डॉ. जयश्री तोडकर, मेटाबॉलिक-लॅप्रोस्कोप‌िक सर्जन

No comments:

Post a Comment